महाराष्ट्राने नाकारलेल्यांना केंद्रात मंत्री बनवणे ही “त्यांची” घाणेरडी चाल…

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; नारायण राणे यांच्यासह भाजपवर नाव न घेता टीका…

मुंबई ता ११: 
महाराष्ट्राने नाकारलेल्यांना केंद्रात मंत्री बनवणे ही भाजपाची घाणेरडी चाल आहे.अशी टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता केली.त्यांना बरोबर घेऊन,तसेच आपल्या पक्षात घेऊन आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न झाला.मात्र आम्ही त्यांना पुरून उरलो,कोकणाच्या नशिबात संघर्ष असेल तर तो नेहमी करण्यास आम्ही तयार आहोत.मुख्यमंत्री बनवण्याबाबत उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य आहे.लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापित होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही आग्रही आहोत.मात्र हे करत असताना मला मंत्रीपद द्यावे,की न द्यावे हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे असाही पुनरुच्चार केसरकर यांनी केला.
श्री.केसरकर यांनी एका खाजगी वहिनीला आपली प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली.ते म्हणाले ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ज्यांचे क्रिमिनल बॅकग्राउंड आहे.अशा लोकांना अरविंद सावंत यांच्या रिकाम्या झालेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा ठिकाणी स्थान देण्याचे घाणेरडे राजकारण भाजपाची मंडळी करत आहे हे चुकीचे आहे.त्यांना बरोबर घेऊन आपल्या पक्षाच्या विरोधात सिंधुदुर्गात उभे करण्यात आले मात्र त्याचा काय फायदा झाला याचे चित्र आज डोळ्यासमोर आहे.असे केसरकर म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी शपथ विधी होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे मात्र लवकरात लवकर शपथविधी होऊन येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले जावे ही आपली इच्छा आहे.

\