विशाल परबांचा विश्वास ; मतदार केंद्राचा आढावा, उमेदवारांना शुभेच्छा…
सावंतवाडी ता.०२: आम्ही भाजप म्हणून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले आहोत. त्यामुळे तब्बल पंचवीस वर्षांनी सावंतवाडीत परिवर्तन दिसेल, असा विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. परब यांनी सावंतवाडीतील मतदान केंद्रावर जाऊन आढावा घेतला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदारांना व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ते म्हणाले, या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूकीला सामोरे गेलो आहोत. टीका टिपण्या बाजूला ठेवून आम्ही आमचे काम केले आहे. त्यामुळे काही झाले तरी या ठिकाणी आम्हाला यश मिळणार आहे. भाजपच्या माध्यमातून राज्यात- केंद्रात विकास झाला आहे. ही विकासाची गंगा सावंतवाडी शहरात देणे गरजेचे आहे. सावंतवाडी शहराचा विकास नियोजनबद्ध आणि सर्वांगीण होणे गरजेचे आहे. रोजगार आणि आरोग्याच्या मुद्द्यावर येथील जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे काही झाले तरी या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे तब्बल २५ ते ३० वर्षांनी सावंतवाडी शहरात परिवर्तन झालेले दिसेल. येथील मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



