सिंधुदुर्ग, ता.०२: जिल्ह्यात आज सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळेत चारही नगरपालिकेत मतदानाची टक्केवारी लक्षणीय राहिली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार या दोन तासांच्या कालावधीत कणकवली नगरपरिषदेत सर्वाधिक १५.८४% मतदान झाले आहे, मालवणमध्ये मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला असून येथे १५.१८% मतदारांनी आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. सावंतवाडीत आकडा १२.१७% नोंदवला गेला आहे. तर सर्वात कमी मतदान हे वेंगुर्लेत झाले आहे. जिथे १०.५१% मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान केले.
सकाळच्या वेळी थंडी आणि कामावर जाण्याची घाई असतानाही मतदारांनी दाखवलेला हा उत्साह आज दिवसभर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान होईल, याचे संकेत देत आहे.



