Tuesday, December 2, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यालकरकोट-बांदा येथे ४ व ५ डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सव...  

लकरकोट-बांदा येथे ४ व ५ डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सव…  

बांदा,ता.०२: श्री दत्त मंदिर, लकरकोट-बांदा येथे यावर्षी ४ व ५ डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या उत्सवात महापूजा, अभिषेक, सामूहिक गाऱ्हाणे, भजन-संध्या, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी उत्सवात उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद लाभावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहिल्या दिवशी ४ डिसेंबरला पहाटे ५ वा. काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी ८ वा. महाराजांची महापूजा व सार्वजनिक अभिषेक, सकाळी ९ वा. सत्यनारायण पूजा, दुपारी १ वा. महानेवेद्य, महाआरती व सामूहिक गाऱ्हाणे, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री दत्त जन्म व कीर्तन, सायंकाळी ६ ते ९ वा. भजनांचे कार्यक्रम, रात्री ९.३० वा. शेजाआरती, रात्री १० वा. दोन अंकी धमाल मालवणी विनोदी नाटक “वर्सल एक रहस्यमय प्रेम कहाणी” आदी कार्यक्रम होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबरला सकाळी ९ वा. श्री दत्त महाराजांची नित्यपूजा, दुपारी १ वा. महानेवेद्य, महाआरती व सामूहिक सांगता गाऱ्हाणे, दुपारी १.३० वा. महाप्रसाद (समराधना) आदी कार्यक्रम होणार आहेत.

उत्सवाचे आयोजन दत्तप्रसाद कला, क्रीडा मंडळ, लकरकोट बांदा यांनी केले असून मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम यांनी सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments