Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत शिवसेच्या तालुका कार्यकारणीची आढावा बैठक संपन्न...

वेंगुर्लेत शिवसेच्या तालुका कार्यकारणीची आढावा बैठक संपन्न…

वेंगुर्ले : ता.१२
शिवसेनेच्या तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकिमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, सुनिल डुबळे,बाळा दळवी, तालुका प्रमुख बाळू परब, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, महिला तालुका संघटक सौ सुकन्या नरसुले, उपनगराध्यक्षा सौ अस्मिता राऊळ,माजी नगराध्यक्ष संदेश निकम,शहर प्रमुख अजित राऊळ, नगरसेविका सौ सुमन निकम, शहर महिला संघटक सौ मंजूषा आरोलकर, प्रकाश गडेकर आदी पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी विधानसभेत झालेल्या मतदानाचा विभाग नुसार आढावा घेण्यात आला.संघटना वाढीसाठी आवश्यक गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चांदा ते बांदा योजना संदर्भात येणाऱ्या अडचणी जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी जाणून घेतल्या व ही योजना सविस्तर लोकांना समजण्यासाठी विभाग नुसार व नंतर गावानुसार बैठका घेण्याचे सुचविण्यात आले. तसेच विकास कामांवर चर्चा करून मंजूर झालेल्या कामांचा बॅनर लावले पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या. तसेच तालुका कार्यकारिणी चा मासिक सभेला सर्व पदाधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे.ज्यांना संघटनेसाठी वेळ द्यायला मिळणार नाही त्या पदाधिकारींनी स्वत: म्हणून राजीनामा द्यावा. आप आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून संजटना वाढीवर भर दिला पाहिजे. अशा सक्त सूचना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments