राज्यस्तरीय साहित्य संमेलनात वेंगुर्लेतील वैभव खानोलकरांचा संत्कार…

2

वेंगुर्ले : ता.१३
मुंबंईत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य कला नृत्य संमेलनात सिंधुदुर्ग जिल्हृयाचे सुपुत्र वैभव खानोलकर यांच्या निवेदनाची विशेष स्तुती श्वास चित्रपटाचे निर्माते आणि सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अरुण नलावडे यांनी घेत त्याचा विशेष संत्कार केला.कला नृत्य साहित्य अकादमी ठाणे आयोजित राज्यस्तरीय संमेलन डाँ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मान्यवराच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.
नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे प्रा.खानोलकर यांनी बहारदार सुत्रसंचलान करुन कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी व्यासपीठावर राज परब शिक्षण महर्षि,सकल्प स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती परब, नगरसेवक अब्राहम आवळे, शल्य चिकित्सक डाँ.वाघमारे उपस्थित होते.
प्रा.वैभव खानोलकर हे खानोली गावचे सुपुत्र असुन सांस्कृतिक ,सामाजिक कार्यक्रमात ते राज्यस्तरावर निवेदन करतात त्याच बरोबर दशावतार लोक कलेचे अभ्यासक म्हणुन त्यांची ओळख आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार,त्यांना विविध क्षेत्रातील कामगिरी साठी मिळाले आहे. या सत्कारा मुळे त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

5

4