सावंतवाडीत २१ व २२ डिसेंबरला राज्यस्तरीय पत्रकारांची कार्यशाळा…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

गजानन नाईक यांची माहीती;दोनशेहून अधिक पत्रकार होणार सहभागी…

सावंतवाडी ता.१३:

मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात प्रथमच राज्यातील पत्रकारांची कार्यशाळा ता. २१ व २२ डिसेंबर या काळात सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी आज येथे दिली.येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,सदस्य संतोष सावंत,हरीश्चद्र पवार,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई,सोशल मिडीया सेलचे जिल्हा निमंत्रक अमोल टेंबकर,मयुर चराठकर,समिर कदम,उमेश सावंत,उत्तम नाईक,नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते
यावेळी श्री.नाईक म्हणाले,पत्रकार परिषदेच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि परिषद पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची ही संयुक्त कार्यशाळा होणार आहे.सावंतवाडी येथे २१ व २२ डिसेंबर रोजी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा होईल,या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री दीपक केसरकर,अच्युत भोसले,किरण नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.तर समारोपप्रसंगी आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहे.
यावेळी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या,प्रश्न आदी विषयावर चर्चासत्र होणार आहे.त्यानंतर राज्यातील पत्रकार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत.

\