सावंतवाडी ता.१३:
येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात “हे चांदणे फुलांनी” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग,चंद्र व चांदणे या संकल्पनेवर आधारित एका पेक्षा एक सरस अशा हिंदी-मराठी गीतांच्या सदाबहार नजराण्यांनी सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.
श्री.सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी “हे चांदणे फुलांनी…” जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडीत करण्यात आल. या कार्यक्रमाच उद्घाटन प्र. नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सावंतवाडीच नाव देशात पोहचवण्यासाठी आणि शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह्च्या सिटी ऑन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा अस आवाहन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केल.
अन्नपूर्णा कोरगावकर, श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडीच्यावतीनेही सिटी ऑन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याच आवाहन सावंतवाडीकरांना करण्यात आल. यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र व चांदणे या संकल्पनेवर आधारित जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यामध्ये सद्गुरु संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, अनामिका मेस्त्री, देवयानी केसरकर, विधिता केंकरे, स्मिता केंकरे, पूजा दळवी, प्रांजल कळसुलकर , परी मिठबावकर , नितिन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, चिन्मय साळगावकर, अंकुश आजगांवकर, वैभव राणे, स्मिता गावडे , अनुष्का पेडणेकर, हर्षिता देवरुखकर , पूर्वा देवरुखकर, वैष्णवी गावडे, पावनी गावडे, आर्या बोलके, युक्ता सापळे, पूर्वा चांदरकर , सायली भैरे . या विद्यार्थ्यानी सादरीकरण केल. या कार्यक्रमाला साथसंगत निलेश मेस्त्री (हार्मोनियम) , किशोर सावंत व निरज मिलिंद भोसले (तबला) ,भावेश राणे (ढोलक/ढोलकी) , अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), महेश तळगांवकर (सिंथेसायझर) सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केल तर ध्वनी संयोजन श्री सुभाष शिरोडकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी , रसिका मिठबावकर , वसंत साळगावकर, सोमा सावंत, वैभव केंकरे , हेमंत खानोलकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते, तर नरेंद्र मिठबावकर, शेखर गुरुनाथ पोकळे, सौ दीपा किशोर सावंत, श्रीराम दीक्षित, गुरुदास देवस्थळी, विहांग देवस्थळी, श्री अमेय तेंडुलकर, सौ देविका राऊळ, त्रिवेणी पावसकर, विलास नाईक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या संकल्पनेतून शरद ऋतूच्या गारव्यात सादर होणार्या या कार्यक्रमाला सावंतवाडीतील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.