Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
माजी खास. नीलेश राणेंचा इशारा ; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या…
मालवण, ता. १३ :
येथील नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळायला हवी. काही अधिकारी जाणीवपूर्वक पंचनामे टाळत आहेत अशा अधिकाऱ्यांना शिस्त लावा, अन्यथा आम्ही त्यांचा बाहेरच बंदोबस्त करू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी तहसीलदार अजय पाटणे यांना दिला.
येथील दौऱ्यावर आलेल्या भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी भाजप नेते अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, राजा गावडे, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, लीलाधर पराडकर, गणेश कुशे, पूजा करलकर, बाळू कोळंबकर, मोहन वराडकर, अभय कदम, राजू बिडये, भाई मांजरेकर, सनी कुडाळकर, बाबा परब, आशिष हडकर, मंदार लुडबे, आबा हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राणे यांनी भाजप कार्यालयात पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेत चर्चा केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात शेकडो शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. वादळात झालेल्या नुकसानीची भयावह स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पंचनामा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्त लावा, अन्यथा त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा राणे यांनी दिला. नुकसानीचे पंचनामे झाले नसलेल्या नुकसानग्रस्तांचेही पंचनामे करा, अशा सूचनाही राणे यांनी तहसीलदार पाटणे यांना दिल्या. पश्चिम महाराष्ट्राचे निकष कोकणात चालत नाहीत. शासनाकडून वेळेत मदत मिळाली नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.