Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
महावितरणच्या समस्येसंदर्भात माजी खास. नीलेश राणे आक्रमक…
मालवण, ता. १३ :
तालुक्यातील वीज समस्या संदर्भात येथे सातत्याने का यावे लागत आहे. या समस्या कधी सुटणार हे लेखी द्या असे सांगत माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आता थुकपट्टीची कामे केल्यास येथे वणवा पेटेल असा इशारा श्री. राणे यांनी यावेळी दिला.
माजी खासदार श्री. राणे यांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी भाजप नेते अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, अशोक तोडणकर, राजा गावडे, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, लीलाधर पराडकर, गणेश कुशे, पूजा करलकर, बाळू कोळंबकर, मोहन वराडकर, अभय कदम, राजू बिडये, भाई मांजरेकर, सन्नी कुडाळकर, बाबा परब, आशिष हडकर, मंदार लुडबे, आबा हडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणच्या अनेक समस्या असून त्या दूर करण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसल्यानेच महावितरणच्या कारभाराबाबत ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता आम्हाला आश्वासने नकोच. शिवाय आमच्यासाठी निवेदनाची भाषाही संपली आहे. यापुढे आम्हाला थुकपट्टी लावण्याचा प्रयत्न महावितरणकडून झाल्यास ‘टेबल-खुर्च्या’ बाहेर असतील. तसेच ग्राहकांना दडपशाही वागणूक दिल्यास माझे कार्यकर्ते वणवा पेटवतील, असा इशारा श्री. राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, अशोक सावंत, भाई मांजरेकर यांनीही वीज समस्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर अधिकाऱ्यांनी उद्या दुपारपर्यंत भाजप कार्यालयात आश्वासने पूर्ण करण्याबाबतच्या नियोजनाची प्रत आणून देऊ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.