वेंगुर्ले पाटकर हायस्कूलच्या आवारात अनधिकृत बांधकाम…

2

माजी विद्यार्थी आक्रमक : नगराध्यक्ष व पोलिसांना निवेदन…

वेंगुर्ले : ता.१३
वेंगुर्ले येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या आवारात लागून असलेल्या मदर तेरेसा हायस्कूल प्रशासनाने रा. कृ. पाटकर हायस्कूलची परवानगी न घेता पायऱ्या व ये-जा करण्यासाठी दरवाजाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. सदर अनधिकृत बांधकामा मुळे माजी विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी या बांधकामावर कारवाई करावी अशी तक्रार वेंगुर्ले न. प. चे नगराध्यक्ष दिलीप गिरप व पोलिसस्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी संचलित रा. कृ. पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे. ज्युनिअर कॉलेज यांच्या मालकीची शालेय इमारत व परिसराचा वापर शालेय विद्यार्थी करीत आहेत. याला लागूनच कॅथोलिक चर्च अंतर्गत मदर तेरेसा हे इंग्लिश मिडीअम स्कूल सुरू आहे. इंग्लिश मिडीअमने आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या आवारातील तांत्रिक अभ्यासक्रम इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीला पूर्वकल्पना न देता शालेय विद्यार्थ्यांना ये- जा करण्याकरिता पायऱ्यांचे बांधकाम सुरू केले व तेथील संरक्षक भिंतीला दरवाजा काढण्यात आला आहे. सदरील अतिक्रमण करून केलेले बांधकाम झाल्याचे लक्षात येताच आज माजी विद्यार्थी नगराध्यक्ष दिलीप गीरप, माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, माजी विद्यार्थी अजित राऊळ, विवेक आरोलकर, हेमंत मलबारी, पी. के. कुबल, कपिल पोकळे, आनंद बटा, सुदेश वेंगुर्लेकर आदिनी मुख्याध्यापक श्री.जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सदर कामा बाबत कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले.त्यामुळे या बाबत न.प. आणि पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन अनधिकृत बांधकाम काढण्या बाबत निवेदन देण्याचे ठरले. त्या नुसार तत्काळ संबंधितांना निवेदन देण्यात आले.

5

4