माणगावातील महसूल विभागातील कोतवाल रिक्त पदे तात्काळ भरा…

71
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना लेखी निवेदन..

कुडाळ.ता,१४: तालुक्यातील भाजपचे माणगाव ग्रामपंचायत सदस्य श्री दीपक काणेकर व अनेक कार्यकर्ते यांनी काल उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कुडाळ यांच्याकडे गेली चार वर्षांपासून माणगांवच्या सात महसूल विभागामध्ये सात कोतवाल पदे कार्यरत असणे गरजेचे होते.परंतु एक सुद्धा पद भरले गेले नाही यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याबाबत निवेदन देण्यात आले. श्री काणेकर यांनी लोकांची होणारी गैरसोय व हेराफेरी लक्षात घेऊन उप विभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे समस्या मांडली व निवेदन देऊन लवकरात लवकर रिक्त पदे भरण्यात यावी.
यावेळी श्री कुणाल कोरगावकर,माझी ग्रा.प सदस्य नाना आंबेरकर, शामू जोशी,नारायण केरकर,सदा काणेकर,विनायक शेडगे,श्री केरकर,सुरेश सावंत,संदीप शेडगे,हरीश भोगटे, अनिकेत काणेकर,रोशन केरकर,बाळा कोरगावकर, बाबू इंगळे,व तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

\