सोनुर्ली माऊली देवीचे राजन तेली यांनी घेतले आशिर्वाद…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजू परब,मनोज नाईक यांची उपस्थिती:देवस्थान मंडळाकडुन सत्कार…

सावंतवाडी.ता,१४:
सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवानिमीत्त येथील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आपली हजेरी लावली.
    यावेळी आपण खास श्री देवी माऊलीचे आशीर्वाद घेण्यासाठी खास मुंबईहून आलो असे त्यांनी सांगितले.त्यांच्यासमवेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी,मनोज नाईक आदी उपस्थित होते.
     यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने श्री तेली व सहका-याचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
\