सिंधुदुर्ग विद्यानिकेतन स्कूलच्या विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन

2

वेगुर्ले : ता.१४

विज्ञान प्रयोग शाळेचा वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यासात मोठे यश संपादन करावे असे आवाहन सिंधुदुर्ग विद्यानिकेतन संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले.
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेच्या प्रयोगशाळेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन या संस्थेचे उपाध्यक्ष हर्षद शेख यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, उपमुख्याध्यापिका मानसी आंगणे, विज्ञान विषयाचे शिक्षक, पालक संघाचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

8

4