रावजी यादव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
ओरोस ता 14
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने 25 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत आरक्षित जागेच्या उमेदवारांसाठी देण्यात आलेली माहिती विसंगत असल्याचे स्पष्ट होते. परिणामी परीक्षेत उत्तीर्ण होवून निवड झालेले आरक्षित जागेतील उमेदवार कागदपत्र पडताळणीत बाद ठरू शकतात. त्यामुळे निवड झालेल्या आरक्षित जागेवरील उमेदवारांवर अन्याय होवू नये, याची आपण जिल्हा निवड समिती अध्यक्ष या नात्याने काळजी घ्यावी, असे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांना दिले आहे.
या निवेदनात कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांने प्रमाणपत्र मिळणेकरीता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या सादर केल्यास त्या ग्राहय धरल्या जाणार नाहीत, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. हे आपले म्हणणे संददिय नाही. तसेच ते अटी शर्तीस विसंगत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. आरक्षीत उमेदवारांपैकी आरक्षीत सर्वच उमेदवारांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र असेलच असे नाही.
काही उमेदवारांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र, किंवा जातीचे प्रमाणपत्र मिळणेसाठी काही उमेदवारांनी प्रवेश अर्ज सादर केला तर त्याच्या पावत्या सादर केल्या तर त्या ग्राहय धरल्या जातात. मात्र, आपण कागदपत्र पडताळणीला ही पावती ग्राह्य धरली जाणार नाही, असे म्हटले आहे. तसे झाल्यास निवड झालेल्या आरक्षित जागेच्या उमेदवारांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतल्या सारखे होईल.
माझ्या माहीतीनुसार जातपडताळणी विद्यार्थी ११ वी सायन्समध्येच शिकत असेल, निवडणुकीच्या वेळी किंवा शासकीय सेवेत असेल तर पदोन्नतीचे वेळी किंवा शासकीय नियुक्तीनंतरही प्रस्ताव सादर करण्यास हरकत नसते, असे शासन परिपत्रक आहे. त्यामुळे असा
प्रस्ताव सादर केल्याच्या पावत्या सादर केल्यास त्या ग्राहय मानाव्यात
त्यांना नियुक्तीपासून ठराविक कालावधीची मुदत देणेत यावी, परंतू नियुक्तीपासून वंचित ठेवू न
असे झाल्यास त्या उमेदवारांचे फार मोठे नुकसान होईल, असे रावजी यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.