खुर्चीचे राजकारण करून,सावंतवाडीची अब्रू घालवू नका…

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काँग्रेस पदाधिका-यांचा सल्ला;नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस करणार दावा…

सावंतवाडी.ता,१४:

येथील पालिकेतील नगरसेवक व प्रभारी नगराध्यक्षांनी नगराध्यक्षच्या खुर्चीचा मान ठेवावा.तसेच बाहेरच्या व्यक्तींनी यात
खुर्चीचे राजकारण करून सावंतवाडी शहराची व पालिकेची बेअब्रू करू नये,असा सल्ला काँग्रेसचे पदाधिकारी राघवेंद्र नार्वेकर,बाबल्‍या दुभाषी व अरूण भिसे यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान येणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे.सद्यस्थितीत आठ नगरसेवक आमचे आहेत.हात या चिन्हावर ते निवडून आले आहेत.त्यामुळे येथील जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे.असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नार्वेकर शहराध्यक्ष दुभाषी व माजी शहराध्यक्ष भिसे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले सावंतवाडी पालिकेत सुरू असलेले खुर्चीचे राजकारण हे बालिशपणाचे आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात राजकारण न करता त्या खुर्चीचा मान ठेवणे गरजेचे होते.मात्र त्यांच्याकडून केले जात आहे.हा सर्व प्रकार चुकीचा आहे. सद्यस्थितीत बाहेरच्या व्यक्ती नगराध्यक्षा बाबत बोलतात हे काय योग्य नाही येणाऱ्या काळात होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही निश्चितच नगराध्यक्ष पदावर दावा करणार आहोत.काही झाले तरी आम्हाला मिळेल येणाऱ्या काळात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी वरिष्ठांनी आम्हाला जाऊद्या त्यादृष्टीने पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहे युवक व या सर्व सोबत घेऊन आम्ही पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.

\