वेंगुर्ले-उभादांडा येथील मानसीश्वर देवस्थान मध्ये चोरीचा प्रयत्न फसला…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चोरट्यांना गजाआड करण्याची वेंगुर्लेवासीयांची मागणी….

वेंगुर्ले, ता. १४
वेंगुर्ले येथील रेडकर-चव्हाण यांच्या घरातील चोरीचे प्रकरण ताजे असतानाच आज वेंगुर्ले-उभादांडा येथील प्रसिद्ध मानसीश्वर देवस्थान मध्ये चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न थोडक्यात फसला.
मानसीश्वर देवस्थानच्या समोर असलेली दानपेटी चोरट्यांनी काल रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दानपेटी चे कुलूप तोडल्यानंतर त्यांना ती पेटी उघडून चोरी करता आले नाही. हेच पोलिसांच्या प्राथमीक तपासणीत आढळून आले. चोरी करण्याच्या वेळेत समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून कोणतेतरी वाहन जाताना दिसल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आज सकाळी देवस्थान मधील कुबल यांना दानपेटी चे कुलूप तूटल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी तात्काळ वेंगुर्ले पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी सकाळी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कुबल यांच्या समक्ष पाहणी केली. त्यावेळी तेथील दानपेटीचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. यावेळी दानपेटी उघडून पाहिले असता दान पेटीमध्ये सुमारे तीन हजार पेक्षा जास्त रुपये आढळून आले. यावरून दानपेटीतून पैसे चोरी झाले नसावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र शहरात सुरू असलेल्या या चोरी प्रकरणांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून चोरांना गजाआड करावे अशी मागणी वेंगुर्लेवासीयांकडून होत आहे.

\