दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील यांची उपस्थिती
वेंगुर्ले : ता.१४*
प्री. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला व तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूलमध्ये दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील यांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, का. हु. शेख, ॲड. प्रकाश बोवलेकर, ॲड. संदीप परब, प्रा. डॉ. आनंद बांदेकर, एम. जी. चव्हाण, सुरेंद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बालदिनाचे औचित्य साधून कु. चिन्मय पेडणेकर याने बालदिनाचे महत्त्व विशद केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात न्यायाधीश पाटील यांनी स्कूलच्या प्रगतीविषयी गौरवोद्गार काढले व स्कूल मध्ये अभ्यासा बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे खेळामध्ये या स्कूलने भरीव प्रगती करीत असल्याबाबत समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर व आभार स्वीटी फर्नांडिस यांनी मानले. या कार्यक्रमावेळी शिक्षक वृंद, न्यायालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.