मंत्रिपदासाठी वैभव नाईक काँग्रेस-भाजपच्या संपर्कात…

2

विशाल परब यांचा आरोप; संशय आल्यामुळे पक्षांनी ठेवले होते नजरकैदेत…

कुडाळ ता.१४: केवळ मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक काँग्रेससह भाजपाच्या संपर्कात आहेत,असा आरोप राणे समर्थक विशाल परब यांनी आज येथे केला.ते पक्षत्याग करणार ही माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले होते.काँग्रेसचे संस्कार झालेले नाईक कधीही ही ठेकेदारी आणि मंत्रिपदासाठी अन्य पक्षात जाऊ शकतात,असा आरोप त्यांनी यावेळी केला.
श्री.परब यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.ते म्हणाले शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले नाईक आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.त्यांना शिवसेनेकडून तूर्तास तरी मंत्रीपद मिळणार नाही,हे माहीत झाल्यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळला आहे.ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,असा संशय असल्यामुळे त्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी नजरकैदेत ठेवले,ही वस्तुस्थिती आहे,असाही टोला श्री.परब यांनी लगावला.

11

4