वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,१५: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात बालदिनाच्या निमित्त लिंबू चमचा, डोळे बांधुन काठिने मडके फोडणे, दोन्ही पायामध्ये फुगा धरुन चालणे, पोत्यात पाय घालून चालणे अशा विविध मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटण्यात आली. रंगेबीरंगी फुगे व विद्यार्थ्यांचे पोषाख यांमुळे प्रशालेच्या पटांगणाची शोभा वाढली होती. कार्यक्रम प्रसंगी संस्था अधिक्षक श्री जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक श्री. बी. एस. नादकर, श्री. एस बी. शिंदे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवी च्या वर्ग शिक्षिका व सांस्कृतिक प्रमुख श्रीम. एस. ए. सबनिस यांनी केले. मनोरंजनात्मक खेळांनी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

\