सिंधुदुर्गात प्रथमच “वन ऑन वन बॅटल” डान्स……

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

२३ नोव्हेंबरला;ओमी डान्स अकॅडमीचे वेगुर्लेत आयोजन….

कुडाळ,ता,१५:

सिंधुदुर्गात प्रथमच ओमी डान्स अकॅडमी च्या वतीने वन ऑन वन बॅटल डान्स दंगल २०१९ चे आयोजन शनिवार २३ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता सिद्धिविनायक हॉल भटवाडी वेंगुर्ला येथे करण्यात आले आहे. दंगल २०१९ मध्ये डान्स, डबलबारी धमाका होणार आहे. जिल्ह्यातील ५० सुपर डान्सर हे आमने-सामने येऊन आपलं नृत्यातून कौशल्य दाखवणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत अनेक डबलबाऱ्या झाल्या मात्र त्यामध्ये सिंधुदुर्गात प्रथमच वेंगुर्ले येथे डान्स डबलबारी होत आहे.या आगळ्यावेगळ्या दंगल २०१९ मध्ये कथक स्पर्धक दिसणार त्याचबरोबर वेस्टनसुद्धा स्पर्धक असणार आहेत.अशी माहिती ओमी डान्स अकॅडमी चे संचालक ओंकार परब यांनी दिली. स्पर्धा लहान व खुल्या अशा दोन गटात होणार आहे. अधिक माहिती व प्रवेशिकासाठी ओकार परब ९८८१३८२२१९ गुरुनाथ तुळसकर ७८८७५७१८३७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

\