भक्ती सावंत ठरली ‘वेंगुर्ला आयडॉल’ दुसऱ्या पर्वाची मानकरी

2

आधार फाऊंडेशन आणि वेताळ प्रतिष्ठान चे आयोजन

 वेंगुर्ले : ता.१५
बालदिनाचे औचित्य साधून आधार फाउंडेशन वेंगुर्ला आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी नगर वाचनालय, वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या ‘वेंगुर्ला आयडॉल’  स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. दोन गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत कु.भक्ती वीरेंद्र सावंत ‘वेंगुर्ला आयडॉल २०१९’ ची मानकरी ठरली.
कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आधारच्या अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर, सचिव नंदन वेंगुर्लेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परूळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, कैवल्य पवार, मंगलताई परुळेकर, प्रज्ञाताई परब, डॉ.वंदन वेंगुर्लेकर, बाबली वायंगणकर, सद्गुरु सावंत  गुरुदास तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेला  बालक-पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: लहान गट (विभाग पहिला) प्रथम- रिया विश्वनाथ शेट्ये, द्वितीय- तपस्या संदीप परब, तृतीय- गंधर्व विनायक वारंग, लहान गट (विभाग दुसरा) प्रथम- मनस्वी सुहास रेडेकर, द्वितीय- शर्व बाळकृष्ण आपटे, तृतीय- आर्या नागेश वेंगुर्लेकर, मोठा गट (विभाग पहिला) प्रथम- अदिती विवेक चव्हाण, द्वितीय- अनुराधा जयवंत परब, तृतीय – एकता नागेश वेंगुर्लेकर, मोठा गट (विभाग दुसरा)* प्रथम- पायल अतुल नेरुरकर, द्वितीय- ईशा सुधर्म गिरप, तृतीय-  प्राशा सुजित चमणकर  यांनी यश संपादन केलं. सदर स्पर्धेचे परीक्षण संजय पाटील आणि मनिषा परब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण राऊळ, ओंकार राऊळ, ऐश्वर्या काणेकर, सुमन मांजरेकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साई भोई यांनी तर आभार महेश राऊळ यांनी मानले.

1

4