शिवसेनेचा मुख्यमंत्री लवकरच विराजमान होणार ; आमदार वैभव नाईक…

98
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कोकणातील शिवसैनिकांची जबाबदारी वाढणार ; नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळणार…

मालवण, ता. १५ :
येत्या काळात राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त विकासाची कामे मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी कोकणातील शिवसैनिकांवर आहे. त्यादृष्टीने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे.  चक्रीवादळ, अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचा पंचनाम्याची कार्यवाही पूर्णत्वास आली आहे. लवकरच सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून दिली जाणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिली.
     शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दैवज्ञभवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, बाबा सावंत, कमलाकर गावडे, तृप्ती मयेकर, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, शीला गिरकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, आतू फर्नांडिस, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, छोटू ठाकूर, नंदू गवंडी, राजू आचरेकर, प्रियांका रेवंडकर, पूजा तोंडवळकर, नंदा सारंग, नीलम शिंदे, विद्या फर्नांडिस, अंजना सामंत, दिलीप परब, महेंद्र म्हाडगुत, भगवान लुडबे, मंदार गावडे, दर्शन म्हाडगुत, किरण वाळके, सन्मेश परब, उमेश मांजरेकर, बाबू मांजरेकर, स्वप्नील आचरेकर, यशवंत गावकर, अक्षय भोसले यांच्यासह विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     आमदार नाईक म्हणाले, क्यार चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्व नुकसान ग्रस्तांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्तांना ही मदत मिळवून देण्यासाठी त्या त्या विभागात शिवसेना मदत केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना शासनाची मदत दिली जाणार आहे. यासाठी त्या त्या विभागातील पदाधिकार्‍यांनी आवश्यक कार्यवाही येत्या काही दिवसात करावी असे आवाहन त्यांनी केले.
     राज्यात लवकरच सत्ता स्थापन होणार असून यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल. कोकणातील जास्तीत जास्त विकासात्मक कामे मार्गी लावण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर असणार आहे. त्यादृष्टीने सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यतत्पर राहून आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक काळात शिवसेनेच्या माध्यमातून जनतेला जी आश्‍वासने दिली ती पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध राहू. जिल्ह्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल यादृष्टीनेही येत्या काळात भरीव काम करणार आहे. देवलीतील माळरानावर हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय साकारण्यात येणार असून याची कार्यवाहीही येत्या काळात केली जाणार आहे असेही आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
     या बैठकीनंतर आमदार नाईक यांनी पालिकेस भेट देत आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील तारकर्ली देवबाग रस्ता, चौके धामापूर रस्ता, मालवण कसाल रस्ता, कोळंब नवीन पूल, हुबळीचा माळ ते पेंडूर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, शासकीय विश्रामगृहाचे नवीन बांधकाम, शिवराजेश्‍वर मंदिर या विविध कामांसंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, शाखा अभियंता प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा केली. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
\