कणकवली नगरपंचायत सत्ताधार्‍यांचा ढिसाळ कारभार….

84
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कन्हैया पारकर यांची टीका : डांबरीकरणाची कामे दोन वर्षे रखडली….

कणकवली, ता.15 :

कणकवली नगरपंचायतीमधील विद्यमान सत्ताधार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील रस्ते डांबरीकरणाची कामे गेली पावणे दोन वर्षे रखडली आहेत. आम्ही निधी आणला, निविदा मंजूर केल्या. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते नारळ वाढवून या कामांची भूमिपूजनेही केली. परंतु विद्यमान सत्ताधार्‍यांनी ही कामे सुरू करण्यास पावणे दोन वर्षाचा कालावधी घेतला. त्यामुळे कणकवलीवासीय विकासापासून वंचित राहिले असल्याचा आरोप भाजप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला.
येथील विजयभवनमध्ये श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत नगरसेवक रूपेश नार्वेकर, शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांच्यासह भूषण परुळेकर, शेखर राणे, सुजित जाधव, योगेश मुंज, प्रसाद अंधारी, विलास कोरगावकर, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.
श्री.पारकर म्हणाले कणकवली शहरातील सार्वजनिक पथदीप उभारण्याच्या कामांनाही आम्हीच मंजूरी दिली होती. आम्ही आमच्या कार्यकाळात जास्तीत जास्त निधी आणून शहरात विकासकामे केली. आता विद्यमान पदाधिकार्‍यांनी जास्तीत जास्त निधी आणावा हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे. दरम्यान शहरातील लक्ष्मी चित्रमंदिर आचरा रोड ते गांगो मंदिर राष्ट्रीय महामार्ग या नव्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. केवळ ठेकेदाराला पैसे मिळावे या हेतूनेच हे काम केले जात असल्याचा आरोप कन्हैया पारकर यांनी केला. तसेच या कामाची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
शहरातील भालचंद्र आश्रम मारुती मंदिर मागील बाजूस उद्यान आणि क्रीडांगणाचे आरक्षण आहे. या विकासकामांसाठी आम्ही आमच्या कार्यकाळात निधी आणला. मात्र गेल्या पावणे दोन वर्षात विद्यमान सत्ताधार्‍यांना या कामांच्या निविदाही प्रसिद्ध करता आल्या नाहीत अशी टीका श्री.पारकर यांनी केली.

\