वेंगुर्लेत जिल्हा परिषदच्या विविध कामांची आढावा बैठक संपन्न…

86
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एकमेकांच्या सहकार्यातून विकास कामे मार्गी लावूया;संजना सावंत…

वेंगुर्ले :ता. १५:
जिल्हा वार्षिक योजना, नागरी सुविधा, जन सुविधा, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास, समाजकल्याण, बांधकाम वगैरे योजनेतील आपल्या गावातील प्रस्ताव प्रलंबित असतील तर ते तत्काळ पाठवा. काही त्रुटी असतील तर दूर करून एकमेकांच्या सहकार्यातून विकास कामे मार्गी लावूया असे आवाहन जिल्ह्या परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात आज जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, महीला बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती सुनिल मोरजकर, जि. प. सदस्या समिधा नाईक, सावी लोके, श्रेया सावंत, दादा कुबल, प्रितेश राऊळ, पं. स. सदस्या साक्षी कुबल, गौरवी मडवळ, आदी उपस्थित होते. या आढावा बैठकित जिल्हा वार्षिक योजना, नागरी सुविधा, जन सुविधा, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास, समाज कल्याण, बांधकाम, वगैरे विविध खात्यामार्फत चालु असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी परबवाडा सरपंच पप्पू परब, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, शिरोडा सारपंच मनोज उगवेकर यांनी चौदाव्या वित्त आयोग, तांडा वस्ती व अन्य योजनां अंतर्गत कामांबाबत प्रश्न उपस्थित केले व माहिती घेतली. तसेच अन्य उपस्थित सरपंच यांनी आपआपल्या भागातील विकास कामांसंदर्भात चर्चा केली. विकास कामे घेताना विविध हेडखाली घ्या, नागरी सुविधाखाली प्रत्येक ग्रा. पं. ना निधी देण्यात आला आहे. त्यातुन विकास कामे करा, गाव तेथे समाज मंदिरसाठी प्रस्ताव पाठवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. गट विकास अधिकारी उमा पाटील यांनी आभार मानले. या बैठकीस तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
\