जुन्या काळातील मत्स्य व्यापारी नाणी कवटकर यांचे निधन…

2

जुन्या काळातील मत्स्य व्यापारी नाणी कवटकर यांचे निधन…

मालवण, ता. १५ : शहरातील मेढा येथील रहिवासी आणि जुन्या काळातील प्रसिद्ध मत्स्य व्यापारी आणि मालवण मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन नारायण ऊर्फ नाणी शंकर कवटकर (वय-८७) यांचे आज सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मत्स्य व्यावसायिक बंटी कवटकर यांचे ते वडील होत. उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

17

4