दिपक केसरकरांच्या अभिनंदनाचे बॅनर अज्ञाताने फाडले…

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माडखोल कलबिस्त येथील घटना;पोलिस ठाण्यात शिवसेना पदाधिका-यांची तक्रार…

 सावंतवाडी.ता,१६:
येथील माडखोल विभागातील शिवसेनेने लावलेले बॅनर्स अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली आहे.याबाबत शिवसेना पदाधिका-यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
     विधानसभा निवडणुकीत आमदार केसरकर यांना निवडून दिल्याबद्दल जाहीर आभार’अशा आशयाचे माडखोल जिल्हापरिषद विभागात लावलेल्या बॅनर्सपैकी कलंबिस्त मळा येथील बॅनर सुमारे ६ दिवसांपूर्वी तसेच सावरवाड गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक लावलेला बॅनर २ ते ३ दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने फाडल्याबद्दलची तक्रार आज शिवसेना माडखोल विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ तसेच अन्य पदाधिकारी यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला दाखल केली.
       याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रशांत कोठावळे, मायकल डिसोजा, प्रसाद मडगावकर, संदेश बिडीये, सिद्धेश शिरसाट, प्रीतम कुडतरकर, एकनाथ कुडतरकर, राजेश नाईक,विजय राऊळ, रमाकांत राऊळ, सुभाष रेमुळकर, राजन राऊळ व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
\