केसरकराकडुन ठेकेदार धारेवर; मोनोरेलसह पार्कचे काम तात्काळ करण्याच्या सूचना…
सावंतवाडी.ता,१६: येथील पालिकेच्या उद्यानात एम.टी.डी.सी कडून सुरू असलेले अॅम्युझमेंट पार्कच्या चौथ-याचे काम चुकीचे झाल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून आले आहे.माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या दौऱ्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला.त्यामुळे केसरकर यांनी ठेकेदाराला धारेवर धरले. मुलांची सुरक्षा लक्षात घेता चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे.तसेच मोनोरेलचे काम तात्काळ सुरू करावे अशी त्यांनी सूचना ठेकेदाराला केली.
येथील शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या मोनोरेल आणि ॲम्युझमेंट पार्क कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री केसरकर आज यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दुपारी भेट दिली.पाहणी सुरू असताना लहान मुलांसाठी लावलेल्या झोपाळे व सी-साॅच्या ठिकाणी ही खेळणी काढून पार्कसाठी उभारण्यात येणाऱ्या खेळण्याच्या ठिकाणी चिरे घालून चौथरा उभारण्यात आल्याचे दिसले. हा चौथ-यामुळे त्या ठीकाणी मुलांना अपघात होऊ शकतो असे तेथील नगरसेवक व प्नभारी नगराध्यक्षांनी केसरकर यांच्या नजरेस आणून दिले.तसेच हे काम सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदार वेळ काढू भूमिका घेत आहे असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री केसरकर आक्रमक झाले.त्यांनी तात्काळ ठेकेदाराची दूरध्वनी संपर्क साधून चर्चा केली.चुकीच्या पद्धतीने झालेले काम तात्काळ दुरुस्त करण्यात यावे तसेच मोनोरेलचे काम तात्काळ हातात देण्यात यावे अशी सूचना यावेळी त्यांनी केली.दरम्यान या ठिकाणी ड्रॅगन जम्पिंग सर्कल अशा विविध मनोरंजनाच्या गोष्टी सह मोनोरेल तात्काळ बसवण्यात येणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येणार आहे.असे केसरकर यांनी यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर गटनेत्या आनारोजीन लोबो सुरेंद्र बांदेकर ,मुख्याधिकारी संतोष जिरगे, बांधकाम अभियंता तानाजी पालव, दत्तप्रसाद कुडपकर, मनोज राऊळ आदी उपस्थित होते.