Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याश्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सुंदरवाडी गृपच्या माजी विद्यार्थ्यांचे अलीबागेत संमेलन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सुंदरवाडी गृपच्या माजी विद्यार्थ्यांचे अलीबागेत संमेलन

सावंतवाडी दि.१६ नोव्हेंबर :
श्री पंचम खेमराज  महाविद्यालयात सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी शिक्षण घेणारे माजी विद्यार्थ्यांनी सुंदरवाडी गृप निर्माण केला आहे.या ग्रुपचे चौथे  स्नेहसंमेलन नुकतेच अलीबाग येथे आनंदात झाले. जुन्या आठवणी सोबतच मालवणी कविता, दशावतार,भजन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या स्नेहसंमेलनात सर्वानी धमाल उडविली. यावेळी सुमारे ९० माजी विद्यार्थी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले होते.
सुंदरवाडी गृपचे स्नेहसंमेलन दि.९ व १०नोव्हे.२०१९ या दोन दिवशी अलिबाग, आक्षी येथील अतिशय निसर्गरम्य परिसरात  वसलेल्या कुलपे फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     यावेळी १९८० ते १९९३ या काळातील विविध बॅचचे ९० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.श्री.एस.पी के महाविद्यालय सुंदरवाडी गृपची स्थापना सन २०१५ मध्ये करण्यात आली. या गृपचे संस्थापक,काॅलेजचे माजी जी.एस्. श्री.बाबा वारंग यानीं मुंबईत केली होती.त्यानंतर आज पर्यंत एकुण 280 काॅलेजचे माजी विद्यार्थी या गृप मध्ये सहभागी झाले आहेत.यावर्षिचं मालवणी भाषेतलं हे स्नेहसंमेलन खुपचं आगळं वेगळं ठरलं. अलिबाग स्थित सुखदा रेडकर-पेडणेकर व प्रदीप पेडणेकर या दाम्पत्याने काॅलेजच्या माजी विद्यार्थी या नात्याने अतिशय नियोजनबद्धपणे सुरेख सोय कुलपे फार्म आक्षी येथे केली. मुंबई,ठाणे, पुणे ,कोल्हापूर, सावंतवाडी,बांदा, दोडामार्ग, गोवा या विविध ठिकाणांहुन माजी विद्यार्थी संमेलनासाठी आले होते.संमेलन दि.९ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाला सुरूवात झाली दिपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवुन यजमान प्रदीप आणी  सुखदा पेडणेकर या दांपत्याने कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं.या कार्यक्रम रूपरेषा ठरलेली नसताना सर्वांनी आपापली कला दाखवत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.आपल्या जन्मभुमीतील मालवणीचा वसा घेऊन जमलेली ही मंडळी इथे संवादही खणखणीत मालवणीत साधत होती.रागिणी तोरणे हिने आयत्यावेळी अतिशय सुंदर स्वागतगीत आणि आई जगदंबेची आराधना केली.
यानंतर  मालवणी कवी श्री.दादा मडकईकर यांच्या मालवणी  गणेशवंदनेतुन
     “पयलो नमस्कार माझो गणपती ,आणि दुसरो देवी सरस्वती ” नमन करत त्यालाच जोडुन  संजू पई याने गेट टुगेदर कसं असेल याची काव्यकल्पना उपस्थित चाळेगतीसमोर मांडली आणि खळखळुन हसत सगळे फ्रेश झाले. अलिबागचे मासे नि खाद्यसंसकृती काव्यातुन मांडली गेली .मालवणी संस्कृतीचा भुषण ठरलेला “मालवणी  गाराणा” सगळ्या देवांका साद घालीत घातला गेला नि बारापाचाचा गणित यॅक केला गेला.
यानंतर सगळ्यांका लागलेली भूक अलिबागच्या बोंबिल ,मांदेली आणि बांगडो यानीं शमली. वरती सोलकडी पिवन सगगळे तृप्त झाले. यानंतर क्रिकेट खेळ मुलानीं चालू केला  सायंकाळी अलिबाग येथील मूळ सावंतवाडीची कन्या असलेली रायगड महिला  काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.श्रद्धाताई ठाकुर व श्री. ठाकुर हे सिंधुदुर्ग मंडळाचे  अध्यक्ष श्री. भाई बांदेकर आणि उद्योजक  सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय राणे हे अलिबागेत आलेल्या आपल्या या गावच्या लोकांनां भेटण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिले , त्यांनीं आपली ओळख आणि मालवणी व मराठी माणुस ऊद्योजक व्हावा या हेतूने चालवत असलेली उद्योजकता प्रशिक्षण शिबिरे व शैक्षणिक संस्था उपक्रमांची माहिती दिली .
     अनपेक्षित असा सोहळा रंगला तो तुलसी विवाहाचा सोहळा मालवणी पद्धत मालवणी थाटात बाळा तळवडेकर ला बाशिंग बांधुन नि भरपुरच न संपणाऱ्या मंगलाष्टकांच्या चढाओढीत संपन्न झाला नि सगळे गाववाले धन्य झाले. चिरमुल्याचे लाडू, चिंचा , खटखाटे लाडू यावेळी वर्हाडी मंडळींना वाटले गेले नी मिष्टी  दही साऱ्यानां थंड तृप्त करून गेलं.यानंतर सुरू झाली सूर ताल आणि भन्नाट ठेका धरून नाचायला लावणारी गानमैफिल. सगळेच तरूण होऊन भावगीतं, भक्तीगीतं, कोळीगीतं, प्रणयगीतं, मराठी, हिंदी ..गात होते नाचत होते. आपलं वय, वेदना ,जबाबदाऱ्या , ताणतणाव विसरून बेदुंध नाचत होते गात होते.
     यानंतर खरी रंगत आणली ती अचानक ठरलेल्या मालवणी दशावतार नाटकाने . सगळ्यांची सुस्ती , झोप उडवणारं हे दशावतारी नाटक होतं . आयत्यावेळी जमवाजमव करून सादर केलेलं हे धमाल नाट्य सगळ्यानां पोटात दुखेपर्यंत हसवुन गेलं.यात अनिल ठाकूर यांची राणी “अनिला” , प्रमोद सावंतांचा राक्षस “चरामरासूर ” आणि सदाबहार अभय पंडीत याची अचानक एन्ट्री मारत राक्षसाशी  दशावतारी लढाई आणि ‘राणी अनिला हरण ‘ विशेष हसवुन गेलं यानंतर एकेकाळचा गायक कलाकार ,भजनी बुवा पंचायत समिती माजी सभापती रमेश गावकर याने दर्दभरी मराठी भावगीतं, कोळीगीत ,बालाडान्सगीत, अभंग , हार्मोनियमवर हनुमंत मेस्त्री ची साथ आणि सागळेच मुलं-मुली गायक कलाकार घेऊन तबला पेटीवर वाजवत कधी फेर धरून नाचत तर कधी ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट ‘वर धमाल करत कधी कोकणी ‘माझे राणी माझे मोगा.’गात ही रात्र धुंद कुंद मंतरलेली करून टाकली.शेकोटी कार्यक्रम आणि सभोवती गोल बसुन दोन गृप बनवुन गाण्याच्या भेंड्या समुद्रकिनारी उत्तररात्रीबरोबर रंग चढवत गेल्या.
     श्री.एस.पी.के.महाविद्यालय सुंदरवाडी गृपच्या अविस्मरणिय गेट टुगेदर ची  ही आठवण सदैव सुखावणारी राहिलं असे विविध प्रकारचे जुने खेळ,नाच गाणी आणि विनोद सादर करून स्नेहसंमेलात धमाल उडविली.यावेळी महेश आरोलकर,सौ.सिमा मठकर, कमलाकर सामंत,सौ.स्मिता सामंत, संजय सुभेदार, अँड देवानंद मणेरीकर, सखाराम गवस , संतोष मुंज यांनी देखील या मध्ये सहभाग घेतला.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments