दुचाकी चालक सुदैवाने बचावला; उभा कंटेनर न्यूट्रल झाल्याने घडला प्रकार…..
बांदा ता.१७:
गोवा पोलिसांच्या पत्रादेवी येथील पोलीस तपासणी नाक्यावर अवजड मालाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक न्यूट्रल होऊन पाठीमागे असलेल्या गोवा परिवहनच्या प्रवासी बसला धडकला. बसचालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला. हा अपघात काल रात्री उशिरा घडला. यामध्ये बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रातून गोव्यात अवजड वाहतूक करणारा कंटेनर पत्रादेवी-गोवा येथील पोलीस तपासणी नाक्यावर तपासणीसाठी थांबविण्यात आला होता. चालक गाडीची कागदपत्रे घेऊन चौकीत गेला होता. कंटेनरच्या मागे गोवा परिवहन मंडळाची प्रवासी बस उभी होती.
अचानक कंटेनर न्यूट्रल झाल्याने उतारावरून मागे येऊन उभ्या असलेल्या बसला धडक दिली. बस चालकाने उडी मारल्याने तो बचावला. बसचे मात्र नुकसान झाले. नाक्यावरच गाड्या धडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहने बाजूला केल्यावर रात्री उशिरा वाहतूक सुरळीत सुरू झाली.