मळेवाड-हेदुलवाडीतील श्री गजानन महाराज मंदिरात अन्नछत्राचा शुभारंभ…

104
2
Google search engine
Google search engine
Google search engine
सावंतवाडी ता.१७:
तालुक्यातील मळेवाड-हेदुलवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात मंडळाकडून उभारण्यात आलेल्या अन्नछत्राचा शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला.या अन्नछत्राच्या माध्यमातून दर गुरुवारी मंदिरात येणाऱ्या भक्तगणांना  महाप्रसाद दिला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश आपटे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
श्री.आपटे पुढे म्हणाले,या अन्नछत्रा साठी भक्तांनी केलेली मदत ही केवळ महाप्रसाद साठी विनियोग केला जाणार आहे.तसेच भविष्यात मोफत वैद्यकीय उपचार,शैक्षणिक मदत असे उपक्रम सेवा मंडळाच्या माध्यमातून राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभागृह उभारण्यासाठी व्यावसायिक पुरुषोत्तम वस्त यांनी आर्थिक मदत केली.
.या शुभारंभ प्रसंगा नंतर महाराजांची महाआरती, सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.यानंतर उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी पुरुषोत्तम वस्त,आमोणकर, बाबा देशप्रभु,सुरेश आपटे,राजन नाईक,अजित गाडगीळ उपस्थित होते.यावेळी भक्त ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राजन नाईक यांनी केले.
\