झाराप येथील घटना : रूग्णालयात हलविण्यापुर्वी प्राणज्योत मालवली…..
सावंतवाडी ता.१७:
येथील चारचाकी गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शाळकरी मुलगा जागीच ठार झाला.ही घटना आज सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर झाराप सर्कल परिसरात घडली.चिन्मय संदीप तेंडोलकर वय १३ रा. झाराप असे त्याचे नाव आहे.तो एकुलता एक होता.पाचवीत शिक्षण घेत होता.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दीली.
याबाबत अधिक माहिती अशी की झाराप सर्कल परिसरात चिन्मयचे घर आहे.तो आणि त्याची आई रस्त्यावरून क्लाससाठी पलीकडे जात होते. मात्र अचानक आईचा हात सोडून रस्त्याकडे धावला.यावेळी त्या ठिकाणाहून येणाऱ्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली.यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्याच्या वडिलांचे सावंतवाडीत गॅरेज आहे.तो एकुलता एक मुलगा होता.