सावंतवाडी.ता,१८: येथील पालिकेत होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मराठा समाजातर्फे सीताराम गावडे यांना पसंती देण्यात आली आहे.गेली अनेक वर्षे समाजाप्रती गावडे यांचे काम लक्षात घेता, त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी आज झालेल्या बैठकीत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान श्री गावडे या निवडणुकीत उतरल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.गावडे हे गेली अनेक वर्षे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तसेच त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा लक्षात घेता.गावडे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी आज झालेल्या समाजाच्या बैठकीत घेण्यात आली.