आंबोलीत भटक्या कुत्र्याकडून दोन सांबरावर हल्ला..

752
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सकाळची घटना; मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले…

आंबोली.ता,१८: पाळीव व भटक्या कुत्र्याकडून हल्ला करण्यात आल्याने आंबोली जंगल परिसरात फिरणारी तब्बल दोन सांबरे गंभीर जखमी झाली. त्यातील एक बाजूच्या तळ्यात पडले परंतु त्या दोघांना वाचवण्यात यश आले.ही घटना आज सकाळी सहा वाजता घडली.
यासाठी आंबोली येथील मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबचे सदस्य काका भिसे व त्यांच्या टीमने प्रयत्न केले.त्या दोघा सांबरावर अधिक उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.दरम्यान गेले काही दिवस आंबोलीला लगत असलेल्या नगरपंचायत नगरपालिकांच्या क्षेत्रात फिरणारी भटकी कुत्री पकडून आंबोलीत सोडून सोडली जात असल्यामुळे जंगली प्राण्यांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी योग्य उपाय योजना वनविभाग कडून करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.यावेळी मदत कार्यात क्लबचे सदस्य राजेश देऊळकर, शुभम गावडे, अरुण चव्हाण, दीपक कोरगावकर, वनकर्मचारी अमोल पटेकर,पांडुरंग गाडेकर, ज्ञानेश्वर गावडे आदींनी सहभाग घेतला.

\