राजू मसुरकर यांची माहीती;खांब अंगावर पडल्याने झालेले गंभीर जखमी…
सावंतवाडी,ता.१९: घरात काम करत असताना अंगावर खांब कोसळल्यामुळे जखमी झालेल्या कारीवडे येथील “त्या” वृद्धावर शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे.प्रथमतः त्यांची प्रकृती चिंताजनक होती मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी दिली.
ही घटना काल रात्री कारिवडे गोसावीवाडी येथे घडली. रवींद्र यशवंत गोसावी वय.६७ असे त्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली होती.
ही घटना काल रात्री कारिवडे गोसावीवाडी येथे घडली. रवींद्र यशवंत गोसावी वय.६७ असे त्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली होती
श्री.गोसावी हे काल रात्री आपल्या घरात काहीतरी काम करत होते. यावेळी माळ्यावर चढण्यासाठी त्यांनी दोन खांबाच्या मध्ये असलेल्या सरीला धरून वर जाण्याचा प्रयत्न केला.मात्र बाजूला असलेला मातीचा जीर्ण खांब तूटला व त्यांच्या थेट मानेवर कोसळला यात त्यांना गंभीर दुखापत झाली.अशा परिस्थितीत गोसावी यांना कुंटूबियांनी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मानेला व मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकारी पांडुरंग वजरकर यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना गोवा बांबुळीत येथे हलविण्याचा सल्ला दिला.
दरम्यान आज सकाळी गोसावी यांना शस्त्रक्रियेसाठी घेण्यात आले.परंतु मानेच्या ठिकाणी गंभीर दुखापत झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता मात्र शस्त्रक्रिया करण्यास यश आले आहे.त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.अशी माहिती कारीवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व लवू पार्सेकर यांनी दिली.