अक्रम खान:गावच्या हीतासाठी पक्ष देई, त्या उमेदवाराचे काम करू…..
बांदा ता.१९:
बांदा सरपंच पदासाठी उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार हा खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे. बांदा गावच्या हितासाठी व सर्वांगीण विकासासाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याचे आम्ही काम करू. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी सरपंच अक्रम खान यांनी ‘ब्रेकिंग मालवणी’शी बोलताना सांगितले.
भाजप पक्ष हे एक कुटुंब आहे. पक्षाची शिस्त ही सर्वश्रुत आहे. सध्या सोशल मीडियावर भाजपच्या उमेदवारीबद्दल चुकीची माहितीची चर्चा होत आहे. मात्र अद्यापपर्यंत भाजपच्या उमेदवरीबद्दल पक्षीय पातळीवर निर्णय झालेला नाही. पक्ष जो निर्णय घेऊन उमेदवारी देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही १०० टक्के काम करू. भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन खान यांनी केले.