Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
रणजीत देसाई; राज्यात स्थिर सरकार नसल्याने निर्णय…
सिंधुदुर्गनगरी ता.१९:
जिल्हा परिषदेचे नियोजित पाचवे कृषि, पशु-पक्षी प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.राज्यात सरकार कोणाचे ? हे निश्चित न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.सरकार स्थापन झाल्यावर याची तारीख निश्चित करण्यात येईल.त्यासाठी पशुधन व दुग्ध विकास समितीची सभा आयोजित करण्यात येईल,अशी माहिती उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती सभेत दिली.
जिल्हा परिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहात समिती सभापती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. यावेळी प्रभारी सचिव डॉ विद्यानंद देसाई, सदस्य रोहिणी गावडे, सावी लोके, सोनाली कोदे, मनस्वी घारे, सुजाता हळदिवे, संजना कोरगांवकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मालवण सभापती सौ कोदे यांनी प्रदर्शन तारीख निश्चित झाली का ? असा प्रश्न केला. यावर देसाई यांनी नियोजन पूर्ण झाले आहे. सरकार स्थापन होत नसल्याने तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असे सांगितले. यावेळी सभाध्यक्ष देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या शेळी-मेंढी, कुक्कुट पालन लाभार्थी याद्या तालुकास्तरावर गेल्या आहेत. प्रत्येक सदस्यांने आपल्या लाभार्थ्याला परिपूर्ण प्रस्ताव लवकर सादर करून पशु-पक्षी खरेदी करायला सांगा. डिसेंबर 2019 मध्येच लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
यावेळी सोनाली कोदे यांनी पाळीव जनावरे लसिकरण मोहीम वेळेत राबवावी, असे आवाहन केले. यावर डॉ देसाई यांनी लेप्टो स्पायरोसिस या जनावरांच्या आजारावर लस उपलब्ध नाही. यासाठी हा आजार जनावरांना होवू, एवढीच काळजी घेणे आपल्या हातात असल्याचे सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.