कांदळगावात उद्या जनावरांची आरोग्य तपासणी…

130
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पशु संवर्धन विभागाचे आयोजन…

मालवण, ता. १९ :
पंचायत समिती सभापती सोनाली कोदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पशु संवर्धन विभागाच्यावतीने कांदळगाव मधील ग्रामस्थांच्या सर्व जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर २० नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
     या शिबिरात पशुसंवर्धन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर, डॉ. रवींद्र दळवी हे तज्ज्ञ पशुवैद्यक जनावरांची तपासणी करणार आहेत. शिबिरात गर्भधारणा, वंधत्व, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, रोगप्रतिबंधक लसीकरण, गोचीड प्रतिबंधक जंतनाशक औषध उपचार तसेच इतर औषधोपचार करणार आहेत. तरी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बचतगट संस्थांनी याबाबत गावात या शिबिराबाबत जनजागृती करून हे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
\