वसंत केसरकर; हेक्टरी आठ हजार देवून केंद्र शासनाने बोळवण केल्याची टीका….
सावंतवाडी.ता,२०:
येथीलहेक्टरी आठ हजार रुपये देऊन केंद्र शासनाने कोकणातील शेतकऱ्यांची बोळवण केली आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना किमान पंचवीस हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यासह सातबारा कोरा करणे गरजेचे आहे.परंतु हा सर्व प्रकार म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्यात सारखा आहे.असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आपण शुक्रवार ता.२२ ला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करणार आहे.असेही यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बागायतदारांनी व जिल्हावासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात व उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याला नुकसान भरपाई म्हणून केवळ आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे.
हा सर्व प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. किरकोळ नुकसान भरपाई मिळाल्यानंतर आपले कर्ज फेडायचे कसे असे यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या तसेच त्यांचे सातबारा कोरा करा अशा मागणीसाठी जिल्ह्यात पासून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याची सुरुवात सावंतवाडीत केली जाणार आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.असे त्यांनी सांगितले.