मराठी माणसाने अर्थ व्यवस्थापनात पारंगत व्हावे….

137
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संतोष दळवी:एक पाऊल सिंधुदुर्गवासियांसाठी कार्यक्रमात आवाहन….

सिंधुदुर्गनगरी ता. 20 :
मराठी माणसाने अर्थ व्यवस्थापनात पारंगत व्हावे, यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आपण करू. याचा लाभ घेवून सर्वानी आर्थिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन संतोष दळवी यांनी येथे शासकीय कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
मराठी माणसाला चाकोरी बाहेर जाऊन हुकमी उत्पनाचे साधन व आपल्या कष्टाची मिळकत योग्य प्रकारे गुंतवणुक करून त्याची परतफेड कोणतेही नुकसान न होता मिळण्यासाठी आणि मराठी माणसाला टक्यांची भाषा शिकता यावी. यासाठी सिंधुदूर्ग जिल्हयाचे सुपूत्र संतोष विठ्ठल दळवी यांनी अर्थ व्यवस्थापनाच्या माध्यमातुन सिंधुदूर्ग जिल्हयातील शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना, शाळा व कॉलेजच्या शिक्षकांना तसेच अनेक होतकरू व्यवसाईकांना त्यांच्या कार्यालयाच्या ठीकाणी जाऊन अनेक कार्यशाळा स्वखर्चाने करून सिंधुदूर्ग वासीयांसाठी एक पाऊल समृद्धीकडे अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला आहे.


याच उद्देशाने संतोष दळवी आणि त्यांचे सहकारी हेमंत परब, दयानंद मसुरकर आणि चंद्रहास दळवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदूर्ग येथे अशा प्रकारची कार्यशाळा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. सदर कार्यशाळेच्या ठीकाणी कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते. संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांनी श्री संतोष दळवी यांचे अर्थव्यवस्थापनाचे व संध्याच्या अर्थबाजाराचा असलेल्या सखोल अभ्यासाचे कौतूक केले.
या व्यतिरिक्त १३ नोव्हेंबर रोजी एस पी कार्यालयात, १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. त्यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी भंडारी हायस्कुल व त्या अगोदर वेंगुर्ला कृषी विदयापीठ, मुळदा फळ उत्पादन कॉलेज, कुडाळ हायस्कुल, कणकवली कॉलेज, तसेच सिंधूदुर्गातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असे मिळुन संतोष दळवी यांनी ५५ ते ६० कार्यशाळा जिल्ह्यात आतापर्यंत घेतल्या आहेत.

\