श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
देवगड, ता.२० :
देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील श्री क्षेत्र औदुंबर पार दत्त मंदिर मोर्वे देवस्थान येथे श्री दत्त जयंती निमित्ताने दि ११ डिसेंबर रोजी रात्रौ १० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यास्तरीय (खुला गट ) नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम ३००० व सन्मानचिन्ह द्वितीय विजेत्यास रोख रक्कम २००० व सन्मानचिन्ह तृतीय विजेत्यास रोख रक्कम १००० व सन्मानचिन्ह या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे.
सिंधदुर्ग जिल्ह्यातील डान्स कलाकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन श्री दत्त उपासक श्री सत्यवान कांदळगांवकर कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे,
या डान्स स्पर्धेत नांव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधा:
श्री गुरू कांदळगांवकर ७५८८९०४४०८ श्री संतोष हिवाळेकर ९४०६४५९३८६
सदर स्पर्धा श्री क्षेत्र औदुंबर पार दत्त मंदिर मोर्वे देवस्थान येथे आयोजित करण्यात आली आहे.
दि.१० डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्त पूजा,दत्त याग,होमभवन,आरती ब्राम्हण भोजन,रात्रौ १० वाजता गांव मर्यादित नृत्य स्पर्धा, दि ११ डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्त पूजा,अभिषेक, दुपारी महाप्रसाद,स्थानिक भजने,
सायंकाळी ०७ वाजता श्रुश्राव्य कीर्तन,०८ वाजता श्री दत्त नामावली,महाआरती, श्री दत्त दर्शन,रात्रौ ०९ वाजता महाप्रसाद,
रात्रौ १० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.