पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात,पान खाऊन ‘पिचकारी’ मारणे आले अंगलट

271
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एकावर कारवाई; पाचशे रुपयाचा न्यायालयाकडून दंड

ओरोस ता. २०:   सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात लावालेल्या नोटिसिचे उल्लंघन करत कार्यालय आवारात पानाची पिचकारी मारणाऱ्या व्यक्तीला ही पिचकारी चांगलीच अंगलट आली आहे. त्यांच्या विरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांनी त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकण्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 166 चे उल्लंघन 117 प्रमाणे मनाई आहे. त्याची नोटिस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली असते. तशी नोटिस जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात लावण्यात आलेली आहे. तरीही ओरोस बुद्रुक येथील नंदू शांताराम तळकटकर यांनी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास याचे उल्लंघन करून पानाची पिचकारी मारली. तळकटकर हे कामानिमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. यावेळी ते पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर पानाची पिचकारी मारत असताना अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची गाडी समोर आली. त्यामुळे तुषार पाटील यांनी ते पाहिले. परिणामी पाटील यांनी पानाची पिचकारी मारणाऱ्या व्यक्तिवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले.
त्यामुळे याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल पी एल सारंग यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दिली. त्याला पोलिस नाईक व्ही डी कोयंडे व पोलिस शिपाई के एम पावसकर साक्षीदार आहेत. पानाची पिचकारी मारून नियमभंग करणाऱ्या तळकटकर यांना मुख्य न्याय दंडाधिकारी फडतरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयाने 500 रुपयांचा दंड ठोठावला.

\