क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी उद्या “विनोद कांबळी” क्रिकेट ॲकॅडमीत…

2

क्रीडापटूंसोबत साधणार संवाद ;खेळाडूंना देणार क्रिकेटचे धडे…

कणकवली, ता.२०:
भाजप आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली-कलमठ येथे सुरू करण्यात आलेल्या विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी ला प्रसिद्ध क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी उद्या २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान क्रिकेटचे धडे येथील क्रीडापटूंना ते देणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत.
         कणकवली कलमठ येथे विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमी ला  क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या, काही महिन्यापूर्वी  विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी
विनोद कांबळे अकॅडमीला भेट दिली होती, त्या ठिकाणच्या क्रीडापटूंना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण,याबाबतचे धडे दिले होते. प्रसिद्ध  समालोचक द्वारकानाथ संझगिरी हे वर्ल्डकप, टेस्ट  दुलीप ट्राफी,वन-डे क्रिकेट सामने ,आयपीएल, ट्वेंटी-ट्वेंटी, अशा प्रत्येक क्रिकेट सामन्यांचे समालोचन केलेले आहे . वेगवेगळ्या वृत्तपत्रातून स्तंभलेखन त्यांनी केलेले आहे. क्रिकेट बद्दल चा त्यांचा असलेला  दांडगा अनुभव या भेटीमुळे कांबळी अकॅडमीच्या क्रीडापटूंना मिळणार आहे.

3

4