अक्रम खान यांनी घेतले बांदेश्वर-भूमिका देवीचे दर्शन…

432
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा-सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घातले साकडे…

बांदा ता.२१:
बांदा सरपंचपदासाठी भाजपकडून प्रभारी सरपंच अक्रम खान यांना उमेदवारी जाहीर होताच खान यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी बांद्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव बांदेश्वर-भूमिका मातेचे दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण केले.
     यावेळी त्यांनी बांदावासीयांची सेवा करण्याची संधी व बळ मिळो अशी प्रार्थना बांदेश्वर चरणी केली. अक्रम खान हे भाजपचे युवा नेतृत्व असून त्यांचे सर्वधर्मीयांशी सलोख्याचे संबंध आहेत. खान हे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
\