बांदा सरपंच पदासाठी शिवसेनेकडून मकरंद तोरस्कर..

460
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल;जोरदार शक्ती प्रदर्शन…

बांदा ता.२१:
सरपंचपदासाठी आज शिवसेनेचे उमेदवार मकरंद तोरस्कर यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांच्याकडे दुपारी साडेबारा वाजता दाखल केला. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     आज दिवसभरात पहिला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांनी दाखल केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संदेश भोगले उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेकडून मकरंद तोरस्कर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, डॅनी आलमेडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेने कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
    यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, स्थानिक शिवसेना नेते श्रीकृष्ण काणेकर, सुशांत पांगम, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, हनुमंत सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तोरस्कर यांनी यावेळी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले.
\