शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडवा,अन्यथा आंदोलन…

205
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अखिल भारतीय वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाचा इशारा…

वेंगुर्ले ता.२१:
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात न सोडवल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लाने गटविकास अधिकारी वेंगुर्ले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या धीम्या कारभारामुळे वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अंशदायी पेन्शनधारक शिक्षकांची सातवा वेतन आयोग फरकाची देयक प्रलंबित आहेत, बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तके बदली झालेल्या विकासगटाकडे बदल्या होऊन सहा महिने झाले तरीही पाठवण्यात आलेली नाहीत, वैद्यकिय खर्चाची देयके प्रलंबित आहेत, तसेच स्थायी प्रमाणपत्र शिक्षकांनी मागणी करूनही कार्यवाही होत नाही, महाराष्ट्र दर्शन प्रवास खर्च प्रलंबित देयके, सेवापुस्तके अद्ययावत करणे इत्यादी प्रलंबित विषयांचा संघटने मार्फत पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने अखेर वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निवेदनातील प्रलंबित प्रश्न २९ नोव्हेंबर पर्यंत न सूटल्यास संघाच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे कळविले आहे. निवेदन देताना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर, सरचिटणीस सागर कानजी, माजी अध्यक्ष झिलू गोसावी, करपुरगौर जाधव, वैदेही गोसावी, जयंत वजराटकर, अनिशा झोरे, तेजस बांदिवडेकर, रामचंद्र झोरे, दिप्ती कोचरेकर, निळकंठ गौतम, गुंडू शेळके, मनोज बहिरम, संदीप कोकणी, विजय म्हस्के,इ पदाधिकारी उपस्थित होते.
\