दोडामार्गला कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका द्या,अन्यथा आंदोलन…

184
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांच्यावतीने आनंद तळणकर यांचा,आरोग्य प्रशासनाला निवेदनाद्वारे  इशारा…

दोडामार्ग.ता,२१:
 तालुक्यासाठी देण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका सावंतवाडी व बांदा या पर्यायी ठिकाणी पाठविण्यात येत असल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करून हक्काची रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या,अशी मागणी आज येथील ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि दोडामार्ग विकास मंच आनंद तळणकर यांनी केली.
याबाबत त्यांनी आज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर येवाळे यांना निवेदन दिले.तात्काळ याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा जनतेच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.यावेळी दीपक देसाई,अनिल बिडये,आप्पा गवस,अर्जुन गवस,सूर्या नाईक,संतोष बोडेकर,जीवन सावंत आदी उपस्थित होते.
\