कुटीर रूग्णालयात बेसिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा..

148
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मेघ:श्याम काजरेकर यांचा घरचा आहेर;आरोग्य अधिका-यांना धरले धारेवर…

सावंतवाडी ता.२१: येथील कुटीर रुग्णालयात चांगले डॉक्टर आहेत,ते चांगली वैद्यकीय सुविधा देतात,परंतु त्या सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेली बेसिक सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांसह रुग्णांची गोची होत आहे त्यामुळे आवश्यक बेसिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा,असा घरचा आहेर सदस्य मेघ:शाम काजरेकर यांनी आज येथे आयोजित पंचायत समितीच्या बैठकीत दिला.
पंचायत समिती मासिक बैठकिला अधिकारी वर्ग उपस्थित राहत नसतील तर आम्ही लोंकाचे प्रश्‍न कोणाकडे मांडावेत,सभागृहाचाच अधिकारी वर्गावर वचक नसल्याने असे प्रकार होत असल्याचा,आरोप श्रीकृष्ण सावंत यांनी केला.तर अधिकारीवरर्गाला सभेला उपस्थित राहण्याची आम्ही सक्ती करू शकत नाही,अशी सारवासारव सभापती पंकज पेडणेकर यांनी केली.यावर सर्वच सदस्य आक्रमक होत अधिकारी हे जनतेचे सेवक असल्याने त्यांनी सभेला उपस्थित राहणे भाग असल्याचे सांगितले.यावर सभापती आणि उपसभापती यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे,आमची नेहमी सहकार्याची भुमिका राहील अशी बाजू विरोधी गटाच्या रूपेश राऊळ यांनी मांडून एकप्रकारे या विषयाना पुर्णविराम दिला.तर जे अधिकारी उपस्थित राहत नाही त्याचा रिंपोर्ट जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार,असे सहाय्यक गटविकास अधिकारी व्हि.एन नाईक यांनी सांगितले.पंचायत समितीची मासिक बैठक आज येथे सभापती पंकज पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळीही व्यासपिठावर उपसभापती संदिप नेमळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी व्हि. एन.नाईक आदी उपस्थित होते.
बैठकिला विविध खातेनिहाय चर्चा झाली यावेळी आयत्या वेळी आलेल्या विषयात सदस्य रूपेश राऊळ यांनी सांगेली ग्रामपंचायत उपसंरपच यांच्यावर अविश्‍वास ठराव आणल्यावर चार दिवसात त्यांनी ग्रामसेवकाकडे आपला राजीनामा दिला.मात्र असे असुनही संबधित उपसंरपचावर अविश्‍वास ठराव आणून एका लोकप्रतिनीचा अपमान करण्यात आला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक असुन त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केली आहे,अविश्‍वास ठरावाआधी ग्रासेवकांनी राजीनामा पत्र तहसिदारांना सादर केले असते तस हा प्रकार झाला नसता असा आरोप केला, मात्र झालेला प्रकार हा नियमाप्रमाणेच असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी सदस्य राऊळ यांना सांगितले.तर पंचायत समितीकडून सदस्याना विकासकामासाठी ठोस निधी उपलब्ध होत नसल्याने जिल्हा परिषदेने अशा निधीसाठी तरतुद करावी जेणेकरून सदस्यांना आपल्या मतदार संघात विकास कामे करता येऊ शकतात अशी मागणी सदस्य रविंद्र मडगावकर यांनी केली.
येथील नव्याने उभारण्यात येणार्‍या एसटी स्थानकाच्या इमारतीसाठी कोठ्यावधीचा निधी उपलब्ध असतांना अद्यापपर्यत इमारतीचे काम होत नाही याला जबाबदार कोण सदरचे काम यावर्षी तरी पुर्ण होणार का असा प्रश्‍नही यावेळी श्री मडगावकर यांनी उपस्थित करत याचे उत्तर पुढच्या मासिक बैठकीत देण्याची मागणी केली.तर शेतकर्‍याच्या भाताच्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली आठ हजार रूपयाची नुकसानी ही शेतकर्‍याची चेष्ठी असुन शेतात काम करणार्‍या शेंतकर्‍याची एका दिवसाची मजुरी गृहीत धरता ही भरपाई अपुरी आहे त्यामुळे या नुकसानी अजून वाढ करण्याची मागणी सदस्यांनी एकमुखानी करत तसा ठराव घेण्याची मागणी केली.
येथील उपजिल्हा रूग्णालयात चांगल्याप्रकारे डॉक्टर उपलब्ध आहेत मात्र असे असुनही त्याठिकाणी हवी असलेली बेसिक सुविधा तेथे उपलब्ध नसल्याने लोंकाची हेळसांड होत आहे, वेळ प्रंसगी लोकवर्गणीतून या सुविधा पुरविल्या जात आहेत त्यामुळे संबधित यंत्रणेला याबाबत पाठपुरावा करा,अशी मागणी सदस्य मेंघश्याम काजरेकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांच्याजवळ केली, तर तालुक्यात डेंग्यु व लेप्टोचे रूग्ण आधळले असुन उपचाराअंती त्याची तब्बेत सुधारली आहे मात्र आरोग्य विभागाकडून खबरदारी घेणात येत असुन ग्रामस्थांनीही ताप आल्यास सरकारी रूग्णातयात तपासणी करावी असे आवाहन श्री शिरोडकर यांनी केले.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केद्रात डॉक्टर रूग्णाना एका साध्या कागदावर औषध व गोळ्या लिघून देतात मात्र एखाद्या औषधाने कोणाना साईट इफेक्ट झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार यासाठी संबधित डॉक्टरांना योग्य सुचना करण्याची मागणी सदस्या मनिषा गोवेकर यांनी केली.

\