बांदा सरपंच पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल

185
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा.ता,२१: बांदा सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीसाठी एकूण ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यामध्ये शिवसेनेकडून ३, भाजपकडून २, काँग्रेस कडून १ व १ अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलेत.
काल अपक्ष उमेदवार साईप्रसाद कल्याणकर यांनी अर्ज दाखल केला होता. आज सकाळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीप्रसाद गोवेकर, शिवसेनेकडून मकरंद तोरस्कर, साईप्रसाद काणेकर, डॅनी आलमेडा यांनी तर भाजपकडून अक्रम खान, संतोष सावंत यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांच्याकडे दाखल केलेत. यावेळी तलाठी वर्षा नाडकर्णी उपस्थित होत्या. ८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून ५ हजार ३२० मतदार बांदा शहराचा सरपंच ठरविणार आहेत. यामध्ये २ हजार ९६० पुरुष मतदार तर २ हजार ९३० महिला मतदारांचा समावेश आहे.

\