सिंधुदुर्ग जिल्हा भाजपात होणार “खांदेपालट”

219
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार यांची माहिती; १० ला जिल्हाध्यक्ष तर ५ डिसेंबरला तालुकाध्यक्ष निवडी

कणकवली, ता.२१: भारतीय जनता पक्षाच्या तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहे. यात 5 डिसेंबरला तालुकाध्यक्ष निवडी तर 10 डिसेंबरला जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यानंतर 15 रोजी प्रदेशाध्यक्ष तर 25 डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईल अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दिली.
श्री.जठार म्हणाले, दर तीन वर्षांनी भाजपच्या नव्या कार्यकारिणीचे गठण होते. यात सर्वप्रथम बूथ समिती आणि बूथ अध्यक्ष निवड होणार आहे. या बूथ अध्यक्षांमधून तालुकाध्यक्ष निवडला जाणार आहे. प्रत्येक बूथ अध्यक्षाला 100 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 931 बूथ आहेत. त्यामुळे 90 हजार ते 1 लाखापर्यंत सदस्य होतील. याखेरीज प्रत्येक तालुक्यात 100 सक्रिय सदस्य असे 8 तालुक्यात मिळून 800 सक्रिय सदस्य केले जाणार आहेत. या सदस्य नोंदणीनंतर 5 डिसेंबरला तालुकाध्यक्ष तर 10 डिसेंबरला जिल्हाध्यक्ष निवड होईल.
भाजपच्या घटनेनुसार मागील तीन वर्षे सदस्य असलेला कार्यकर्ताच ‘सक्रिय’ सदस्य होऊ शकतो. मात्र सिंधुदुर्गात अवघ्या महिन्यपूर्वीच स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यासाठी मागील तीन वर्षे सदस्यत्वाची अट शिथिल करण्यात आली असल्याचे श्री.जठार म्हणाले. तसेच तालुकाध्यक्ष होण्यासाठी जास्तीत जास्त 35 वर्षे वयोमर्यादेची अट आहे. तर जिल्हाध्यक्षासाठी 50 वर्षे पर्यंतची अट आहे. तर आमदार, मंत्री होण्यासाठी 75 वर्षे वयोमर्यादेची अट असल्याचीही माहिती श्री.जठार यांनी दिली.

\